Header

Pune Crime | ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने माजी सरपंचावर कोयत्याने सपासप वार; मुळशी तालुक्यातील सरपंचासह दोघांना अटक

Pune Crime | ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने माजी सरपंचावर कोयत्याने सपासप वार; मुळशी तालुक्यातील सरपंचासह दोघांना अटक

Pune Crime | Ex Sarpanch attacked with a scythe for asking questions in Gram Sabha sarpanch and two others arrested in Mulshi taluka pune rural police paud

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | ग्रामसभेत मागील ग्रामसभेचे (Gram Sabha) प्रोसिडिंग मागितल्याने सरपंचाने (Sarpanch) साथीदारांच्या मदतीने भरग्रामसभेत माजी सरपंचावर (Former Sarpanch) कोयत्याने वार केला (Attempt To Kill). तसेच सुर्‍याने डोक्यात वार केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले जात असताना गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा प्रकार मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) वेगरे गावात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या (Pune Rural Police) पौड पोलिसांनी (Paud Police) सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सरपंच मिनाथ मारुती कानगुडे (वय ३७) आणि अभिषेक दत्तात्रय कानगुडे (वय २१, दोघे रा. वेगरे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी भाऊ पांडुरंग मरगळे (वय ३७, रा. वेगरे, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १५६/२२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Murder)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगरे गावाची ग्रामसभा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली होती.
सभा सुरु झाल्यानंतर माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी मागील ग्रामसभेचे प्रोसिडिंग व घरकुल यादी याबाबत विचारणा केली.
तेव्हा सरपंच मिनाथ कानगुडे याने मी सभेचा अध्यक्ष आहे.
तुम्ही माझ्या परवानगीशिवाय बोलायचे नाही, असे बोलून ग्रामसभेतून बाहेर जाऊन हातात लाकडी दांडके घेऊन आले.
राजेंद्र गुंड याच्या अंगावर धावल्याने भाऊ मरगळे हे मध्ये गेले.
तेव्हा त्याने मरगळे यांच्या हातावर व खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यांच्याबरोबर असलेले अभिषेक व मुन्ना पोळेकर यांना मोठ्याने आवाज देऊन भाऊ मरगळे याला जिवंत मारुन टाक व येथेच पुरुन टाका, असे सांगितले.
मुन्ना याने सुरा फिर्यादीच्या डोक्यात, मानेवर, खांद्यावर मारुन गंभीर जखमी केले.
त्यावेळी मिनाथ याने अभिषेक याच्या हातातील कोयता घेऊन तो फिर्यादीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारला.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

त्यानंतर इतरांनी त्यांना गाडीतून रुग्णालयात नेऊ लागले.
तेव्हा अभिषेक याने गाडी अडवून कोयत्याने गाडीच्या काचा फोडल्या. तरीही त्यांनी गाडी तशीच पुढे नेली.
त्यांच्या गाडीचा आरोपींच्या साथीदारांनी पाठलाग करुन इरिगेश कॉलनीसमोर गाडी अडविली.
दगडाने गाडीच्या समोरची काच फोडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी सरपंचासह दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Ex Sarpanch attacked with a scythe for asking questions in Gram Sabha sarpanch and two others arrested in Mulshi taluka pune rural police paud

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मी भाई आहे या कॉलेजचा’ ! गल्ली बोळाबरोबरच आता कॉलेजमध्येही भाईगिरी सुरु; पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सराईत गुन्हेगाराची दहशत

Pune Crime | प्रेयसीचं ‘झेंगाट’ मॅनेजरशी असल्याचा संशय, जाब विचारताना झालेल्या वादात मित्राचा खून; पुण्याच्या लोकमान्यनगरमधील घटना

Gold Silver Price Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय ?; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या

 

The post Pune Crime | ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने माजी सरपंचावर कोयत्याने सपासप वार; मुळशी तालुक्यातील सरपंचासह दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article