Header

Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

Pune Cyber Crime | cyber crime online fraud case of Rs 16 lakh wagholi senior citizen in the name of showing a place for marriage lonikand police station pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | एका ज्येष्ठ नागरिकाने (Senior Citizen) लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi) या वेबसाईटवर नावनोंदणी केली होती.
त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) दुसर्‍या वेबसाईटवर नावनोंदणी करायला लावून स्थळ दाखविण्याच्या नावाखाली तब्बल १६ लाख ३२ हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे (Online Fraud With Senior Citizen) या प्रकरणी वाघोली (Wagholi) येथील एका ६३ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे MSEB मधून निवृत्त झाले आहेत.
त्यांचे पत्नी व मुलांशी पटत नसल्याने ते वेगळे राहतात. उतार वयात कोणीतरी सोबत असावे,
यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी नावनोंदणी केली होती.
त्यानंतर त्यांना लव्ह इन या वेबसाईटवरुन संपर्क साधण्यात आला व नावनोंदणीसाठी ९२० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरले.

त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करुन त्यांना स्थळ दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार ५७९ रुपये ऑनलाईन घेतले. मात्र कोणतेही स्थळ दाखविले नाही अथवा पैसे परत न करता फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Cyber Crime) उतार वयात सोबत असावी, म्हणून त्यांनी केलेला हा प्रयत्न चांगलाच अंगलट आला असून सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Cyber Crime | cyber crime online fraud case of Rs 16 lakh wagholi senior citizen in the name of showing a place for marriage lonikand police station pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

Pune Crime | 5.62 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवेदिता गायकवाड आणि राहुल गायकवाडकडे कोणी गुंतवणूक केली असेल किंवा आरोपींबाबत अधिक माहिती असेल तर…

Gold Silver Price Today | सोन्या – चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या आजचे दर

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्यास 5 लाख तर जीभ हासडणाऱ्याला 11 लाखांचे बक्षिस, बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

Tips To Beat summer Heat | कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

The post Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article