Header

Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

Pune Crime | Gold and silver coins found in excavation cheating fraud case 11 lacs budhwar peth faraskhana police station

पुणे : बहुजननामा  ऑनलाइन – Pune Crime | खोदकामात सापडलेली सोन्या चांदीची नाणी (Gold And Silver Coins) स्वस्तात देतो, असे सांगणार्‍या चोरट्यांच्या नादी लागून एका ज्येष्ठ व्यावसायिकाने ११ लाख रुपये गमावल्याचा (Fraud Case) प्रकार समोर आला आहे (Pune Crime ) याप्रकरणी बुधवार पेठेत (Budhwar Peth, Pune) राहणार्‍या ६३ वर्षाच्या एका व्यावसायिकाने फरासखाना पोलिसांकडे (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

हा प्रकार १ मार्च ते २० मार्च दरम्यान रविवार पेठेतील त्यांच्या घरी व बुधवार पेठेतील दुकानात घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बुधवार पेठेत दुकान (Shops In Budhwar Peth) आहे. ते दुकानात असताना दोन पुरुष व एक महिला तेथे आले. त्यांनी घराचे खोदकाम करताना चांदीचे व सोन्याची नाणी सापडल्याची बतावणी केली.

प्रथम त्यांना चांदीची व त्यानंतर सोन्याची खरी नाणी तपासणीसाठी दिली ती खरी असल्याचे आढळून आल्यावर फिर्यादी यांचा विश्वास बसला (Pune Crime) त्यानंतर ते फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी एका कापडी पुरचुंडीत पिवळे धातूची १ किलो वजनाची नाणी देऊन त्याबदल्यात त्यांच्याकडून ११ लाख रुपये रोख घेतले.

त्यानंतर फिर्यादी यांनी ते गाळण्यासाठी दिले असताना ती नाणी सोन्याची नसून लोखंडी धातूची असल्याचे समजले. त्यानंतर आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Gold and silver coins found in excavation cheating fraud case 11 lacs budhwar peth faraskhana police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | सोन्या – चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | 5.62 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या निवेदिता गायकवाड आणि राहुल गायकवाडकडे कोणी गुंतवणूक केली असेल किंवा आरोपींबाबत अधिक माहिती असेल तर…

Maharashtra State Government | बळीराजासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! गावठाणापासून 200 मीटरच्या आतील जमिनीला ‘एनए’ ची गरज नाही

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या हातात बांगड्या भरणाऱ्यास 5 लाख तर जीभ हासडणाऱ्याला 11 लाखांचे बक्षिस, बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

Tips To Beat summer Heat | कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे ? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

The post Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article