Header

Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक

Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक

Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | new rules for income tax pan and aadhar mandatory for rs 20 lakh and above transaction

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) बँक खातेदारांना (Bank Account Holders) एक झटका देण्यात आला आहे. इथून पुढे वीस लाख रुपये अथवा त्याहून जादा रक्कम बँक खात्यामध्ये जमा करताना अथवा खात्यातून काढताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN Card-Aadhar) सादर करणे सक्तीचे करण्यात आलं आहे. याबाबत निर्णय सरकारने (Income Tax New Rules Of Aadhaar-PAN) घेतला आहे. त्याचबरोबर चालू खाते सुरु करताना आणि कॅश क्रेडीट सुविधा (Cash Credit Facility) बँकेकडून प्राप्त करताना संबंधित ग्राहकांना पॅन कार्ड, आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. हा नवा नियम 26 मे 2022 पासून लागू करण्यात आला आहे.

प्रत्येक व्यक्ती जो वीस लाख अथवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करेल (पैसे जमा करणे, काढणे) त्याला पॅनकार्ड आणि आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. हे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तसेच, ग्राहकाने सादर केलेलं पॅनकार्ड आणि आधार कार्ड आणि इतर तपशील कलम 139 अ नुसार छाननीसाठी प्राप्तिकर प्रधान महासंचालक (Principal Director General of Income Tax) अथवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. (Income Tax New Rules Of Aadhaar-PAN)

बँकिंग व्यवहारांमधून अर्थव्यवस्थेत येणाऱ्या काळ्या पैशावर आता केंद्रातील मोदी सरकारचा वाॅच असणार आहे. त्याचबरोबर असे मोठे व्यवहार करणारे ग्राहक यांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पॅनकार्ड, आधार कार्ड देणे बंधनकारक असणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, महत्वाचे म्हणजे या नियमामुळे आता बँकांना आता अशा मोठ्या रकमेचे व्यवहार करताना खातेदारांचा पॅनकार्ड आणि आधारकार्डची माहिती ठेवावी लागणार आहे. तसेच, पोस्ट ऑफिस (Post Office) आणि सहकारी संस्थासाठीही (Co-operative Society) लागू असल्याचे कर सल्लागारांचे मत आहे.

Web Title :- Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | new rules for income tax pan and aadhar mandatory for rs 20 lakh and above transaction

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या लेटेस्ट रेट

MNS On Sharad Pawar | मनसेचा शरद पवारांना जोरदार टोला; म्हणाले – ‘दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम…’

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या; आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

The post Income Tax New Rules Of Aadhaar-PAN | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! बँकेत ‘या’ रकमेच्या व्यवहारासाठी PAN Card-Aadhar बंधनकारक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article