Header

Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD

Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD

Maharashtra Monsoon Update | weather report monsoon arrives in kerala konkan vidarbha in maharashtra rains arrive in western maharashtra

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील काही दिवसापुर्वी मान्सूनचं अरबी समुद्रात (Arabian Sea) आगमन झालं होतं. काही कालावधीत मान्सूनने पुन्हा विश्रांती घेतली. देशातील केरळ (Kerala) भागात प्रथम मान्सूनचं आगमन होतं. मात्र हवामानाच्या अंदाजानुसार Indian Meteorological Department (IMD) मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा वेळेआधीच मान्सून केरळात दाखल झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मान्सूनचा आगामी प्रवासही वेळेत होणार असून आता महाराष्ट्रातही पावसाच्या सरी (Maharashtra Monsoon Update) बरसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून 6 जून ते 10 जून या काळात महाराष्ट्रात धडकणार आहे. मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यात काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारपासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवला जात आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्याच्या (Marathwada) प्रामुख्याने दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देखील दिला आहे. तसेच, पश्चिम विदर्भ, महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Web Title :- Maharashtra Monsoon Update | weather report monsoon arrives
in kerala konkan vidarbha in maharashtra rains arrive in western maharashtra

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Mutual Fund SIP Calculator | रू. 500 मासिक गुंतवणुकीतून 5, 10, 20 वर्षात किती तयार होऊ शकतो फंड, पहा कॅलक्युलेशन

High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात राहतो; जाणून घ्या

High BP | हाय बीपीच्या रुग्णांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, जाणून घ्या

Shivsena MP On CM Uddhav Thackeray | शिवसेना खासदाराचे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त शब्दांत टीकास्त्र; म्हणाले…

Ajit Pawar On Sharad Pawar Visit To Dagdusheth | ‘गेलं तर म्हणायचं का गेले आणि नाही गेले तर म्हणायचं हे नास्तिक’ – अजित पवार

The post Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article