Header

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

Maharashtra Co-operation Department | housing societies rule change make land in the name of housing societies by builder

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Co-operation Department | सोसायटीची नोंदणी (Housing Societies) करतानाच कन्व्हेयन्ससाठीची (Convenience- अभिहस्तांतरण) सर्व अत्यावश्यक कागदपत्रे (Documents) सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या सहकार विभागाकडून (Maharashtra Co-operation Department) घेण्यात आला आहे. कन्व्हेयन्स, डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे.

राज्याच्या सहकार विभागाच्या (Maharashtra Co-operation Department) या निर्णयामु‌ळे सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेयन्स (अभिहस्तांतरण) करताना होणारा त्रास कायमचा थांबणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सुमारे निम्म्याहून जादा गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही. ही बाब भविष्यात सभासदांसाठी अडचणीची ठरणार आहे. तसेच, सोसायट्यांनी कन्व्हेयन्स अथवा डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावं असं आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे (Co-operation Commissioner Anil Kawade) यांनी केलं आहे. त्याबाबतच्या सूचना उपनिबंधकांना (Deputy Registrar) दिल्या गेल्या आहेत.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक सोसायटी नोंदवून सोसायटीचा कारभार सदनिकाधारकांकडे सोपवितात. सोसायटी नोंदविल्यानंतर आगामी 4 महिन्यात कन्व्हेयन्स करून देणे गरजेचे असते. पण, कन्व्हेयन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जातेय. सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिक कन्व्हेयन्स करून देत नसल्याने अनेक सोसायट्यांनी ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चे अर्ज उपनिबंधकांकडे सादर केले आहेत. त्यासाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे गोळा करताना सदनिकाधारकांची कसरत होतेय. तर आताच्या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक हे सोसायटी नोंदविण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली जाणार आहेत.

Web Title :- Maharashtra Co-operation Department | housing societies rule change make land in the name of housing societies by builder

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे
 देखील वाचा :

Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

Pune Crime | मैत्रिणीवरुन आंबेगावात दोन गटात राडा ! कोयत्याने एकमेकांवर केले हल्ले, पोलिसांनी केली 11 जणांना अटक

The post Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article