Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Solapur Crime | सोलापूर येथील (Solapur Crime) आलेगाव शिवारात आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात (Walsang Police Station) रात्री उशिरा करण्यात आली.
सोनाली सिद्राम चोपडे (Sonali Sidram Chopde) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून संतोष सिद्राम चोपडे (Santosh Sidram Chopde) (वय 8), संदीप चोपडे (Sandeep Chopde) (वय 5, सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर) असं दोन्ही मुलांचे नावे आहेत. आईने या आपल्या दोन मुलांसह आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर 30/ 2 चे मालक दयानंद वसंत शिंदे (Dayanand Vasant Shinde) यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. (Solapur Crime)
Web Title :- Solapur Crime | incident of suicide in alegaon shivara mother and two children drowned
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर
Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका
Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम
The post Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ appeared first on बहुजननामा.