Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; ‘या’ 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा Alert

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्यात काही भागात पावसाची परिस्थिती निर्माण (Maharashtra Monsoon Update) झाली आहे. मागील काही दिवसापुर्वी पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), विदर्भात (Vidarbha) पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पुन्हा पावसानं डोकं वर काढलं आहे. मुंबई पूर्व उपनगरामध्ये (Mumbai East Suburbs) पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्याचबरोबर मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल आहे. मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलं असून काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) अलर्ट देण्यात आला आहे.
मागील 5 दिवसांपासून श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) मुक्काम ठोकलेल्या मान्सूनचा आगामी प्रवास सुरू झालाय. त्यामुळे आगामी 48 ते 72 तासांत मान्सून केरळात हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीप बेटांच्या काही भागांत मान्सून दाखल झालेला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून लवकरच मान्सून केरळमध्ये (Kerala) धडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Maharashtra Monsoon Update)
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट (Alert) देण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात 30 मे रोजी यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं आहे. 30 आणि 31 मे रोजी या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon alert in maharashtra 2022 rain in 12 district west maharashtra konkan mumbai updates
Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
The post Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; ‘या’ 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा Alert appeared first on बहुजननामा.