Header

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

Maharashtra Monsoon Update | Pre monsoon rains hit damage orchards places konkan monsoon rains sea maharashtra monsoon update news

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | एकीकडे उन्हाचा तडाखा लागला असतानाच आता दुसरीकडे दमदार पावसाचा (Rain) तडाखा लागल्याचं दिसत आहे. राज्यात सध्या काही भागात पावसाची (Maharashtra Monsoon Update) परिस्थिती निर्माण झाली आहे. काल पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada) आणि कोकणात (Konkan) अनेक ठिकाणी वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. कोल्हापूर (Kolhapur), सांगलीत (Sangli) तर पावसाची दमदार एन्ट्री झाली आहे. पावसामुळे काही भागात शेती, फळबागांचे नुकसान झालेय. आजपासून (शनिवार) पावसाचा जोर कमी हाेण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department – IMD) दिली आहे.

6 मे रोजी अंदमानात (Andaman) दाखल झाल्यानंतर दक्षिणेच्या बाजूने मोसमी पावसाची (Rain) प्रगती झाली नव्हती. शुक्रवारी या भागातून मोठी प्रगती करीत मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्रात (Weak Arabian Sea) दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पूर्वोत्तर राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. महाराष्ट्रातही या वाऱ्यांचा प्रभाव जाणवतो आहे. त्यामुळे मागील 2 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, हवामानाच्या अंदाजानुसार (IMD), राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आगामी 2 ते 3 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातून जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, शुक्रवारी सांगली, कोल्हापूर, पंढरपूर भागात मोठ्या पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी, लातूर आदी भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. विदर्भात यवतमाळसह काही भागांत वाऱ्यासह पाऊस, तर तुरळक ठिकाणी गारपीटही झाली आहे.

Web Title :- Maharashtra Monsoon Update | Pre monsoon rains hit damage orchards places konkan monsoon rains sea maharashtra monsoon update news

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

MLA Ram Satpute | भाजप आमदाराच्या कारचा अपघात, गाडीचे 3 टायर फुटले; राम सातपुते सुखरूप

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

The post Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article