Header

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?

Monsoon Update | monsoon rain will arrive 10 days early in kerla says weather forecast

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Monsoon Update | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात उन्हाचा तडाखा लागला आहे. मात्र गरमीपासून आता माणसाची लवकरच मुक्तता होणार असल्याची माहिती आहे. कारण देशात यावर्षी मेघराजा लवकरच अवतरणार आहे. यंदा 10 दिवस आधीच पाऊस (Rain) दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात (Arabian Sea) झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सून (Monsoon Update) भारतात लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे नागरीकांना उन्हापासून सुटका होणार आहे. याबाबत अंदाज युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट संस्थेने (European Center for Medium Range Weather) वर्तवला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

साधारण 20 ते 21 मे रोजी मान्सून अंदमानात (Andaman) दाखल होईल. त्यानंतर 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळात (Kerala) दाखल होईल. गतवर्षी केरळमध्ये 1 जूनला मान्सूनचे आगमन झाले हाेते. मात्र, चक्रीवादळामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन 3 जूनपर्यंत लांबणीवर पडले होते. त्यामुळे आताही सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यासच मान्सून 28 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर मान्सून भारताच्या इतर भागांच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करेल. असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर’ने वर्तवला आहे. (Monsoon Update)

 

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात उन्हाचा चटका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे (Temperature) माणसांच्या जीवाची काहिली होत आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर आहे. विदर्भात (Vidarbha) बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा 44 अंशाच्या (44 Degrees) आसपास आहे. या ठिकाणी 8 आणि 9 मे रोजी तुरळक भागामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, यानंतर मान्सून लवकरच आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून 7 जूनपर्यंत तळकोकणात (Konkan) दाखल होईल. त्यानंतर 4 दिवसांत म्हणजे 11 जूनपर्यंत मान्सून मुंबईत (Mumbai) दाखल होण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Monsoon Update | monsoon rain will arrive 10 days early in kerla says weather forecast

 

हे देखील वाचा :

UPSC Calendar 2023 | यूपीएससीने जारी केले कॅलेंडर, जाणून घ्या केव्हा होईल कोणती परीक्षा

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Raosaheb Danve | ‘मला महाराष्ट्राचा ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे’ – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Pune Crime | हॉटेलमधील भांडणात मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार ! डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

The post Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article