Header

Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Pune Crime | youth drown in khadakwasla dam after jumping from pump house

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | खडकवासला धरणातील (Khadakwasla Dam) पंप हाऊसजवळ पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.7) संध्याकाळी घडली आहे. उंचावर जाऊन पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ (Jumping Video) बनवत असताना ही घटना (Pune Crime) घडली. आशिष सुभाष फुरंगे (Ashish Subhash Furange) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आशिष फुरंगे (वय-18 रा.कर्वेनगर) हा शनिवारी सायंकाळी दोन मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी (Swimming) गेला होता. पाण्यात उडी मारण्याचा व्हिडीओ काढण्यासाठी तो पंप हाऊसच्या कठड्यावर चढला त्यावेळी त्याचा मित्र व्हिडिओ काढत होता. त्याने पाण्यात उडी मारली मात्र तो वर आला नाही. त्यामुळे त्याच्या इतर मित्रांनी आरडाओरडा करुन लोकांना मदतीसाठी बोलावले. (Pune Crime)

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) विलास बांबळे (Vilas Bamble), प्रवीण ताकवले (Pravin Takwale) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच नांदेड सिटी अग्निशमन दलाला (Nanded City Fire Brigade) पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आशिषचा शोध घेऊन त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. उडी मारताना पाण्यात डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title :- Pune Crime | youth drown in khadakwasla dam after jumping from pump house

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

ICAR Recruitment | ICAR भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

MBBS Students News | MBBS च्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

Aadhaar-Mobile Number Update | आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट कसा कराल ?; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार; कुणाला मिळणार नाही लाभ? जाणून घ्या

LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

The post Pune Crime | दुर्दैवी ! स्टंटबाजी करणं पडलं महागात, खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article