Header

Raosaheb Danve on Shivsena | रावसाहेब दानवेंचा घणाघात; म्हणाले – ‘आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू’

Raosaheb Danve on Shivsena | रावसाहेब दानवेंचा घणाघात; म्हणाले – ‘आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू’

Raosaheb Danve on Shivsena | Union minister and bjp leader raosaheb danve criticize cm uddhav thackeray and shivsena over alliance break up

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Raosaheb Danve on Shivsena | मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. यातच शिवसेना (Shivsena) आणि भाजप वाद वाढल्याचं दिसत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘लग्न आमच्यात ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याशी लग्न लावलं. आता आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू,’ असा घणाघात दानवे यांनी केला. (Raosaheb Danve on Shivsena)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

”लग्न आमच्यात ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याशी लग्न लावलं. ज्यांनी मतं दिली त्यांनी भाजपा-शिवसेनेला मतदान केलं. ज्याला मतं दिलं त्याच्या सोबतची युती तोडून टाकली. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी युती तोडली. यांच्या एका मुख्यमंत्रीपदासाठी सर्व आमदार-खासदार नाराज आहेत. त्यामुळे जनता निर्णय करेल. हे काय कोथळा काढतात, निवडणुकीत आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू.” असं रावसाहेब दानवे म्हणाले.

 

पुढे बोलताना दानवे म्हणाले, “बाकीच्यांना सोडा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अच्छे दिन आलेत.
मतदारांनी भाजपा-शिवसेनेला मतदान केलं आणि आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही
हे शिवसेनेला लक्षात आलं तेव्हा त्यांनी धोका दिला.
असंगाशी संगत केली. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले.
स्वतःला अच्छे दिन आले, पण या राज्यातील बारा कोटी लोकांना त्यांनी बुरे दिन आणले,” असा आरोपही त्यांनी केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Raosaheb Danve on Shivsena | Union minister and bjp leader raosaheb danve criticize cm uddhav thackeray and shivsena over alliance break up

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

 

The post Raosaheb Danve on Shivsena | रावसाहेब दानवेंचा घणाघात; म्हणाले – ‘आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article