Header

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Sambhajiraje Chhatrapati | new direction new option sambhaji raje may be left to bjp big announcement on may 12 in pune

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रपती नियुक्त खासदार (President-Appointed MP) म्हणून मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे आता नव्या राजकीय घोषणेच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा उभारणारे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण जे काही बोलायचे ते मी 12 तारखेला बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर आता पुण्यात 12 मे रोजी मेळावा जाहीर करण्यात आला आहे. या मेळाव्यात संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरवर ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी… नवी दिशा, नवा विचार आणि नवा पर्याय..’ असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होऊन जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | new direction new option sambhaji raje may be left to bjp big announcement on may 12 in pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update
हे देखील वाचा :

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! फॅशन डिझायनिंगच्या क्लासला निघालेल्या तरुणीचे अपहरण आणि बलात्कार

Pune Crime | मैत्रिणीवरुन आंबेगावात दोन गटात राडा ! कोयत्याने एकमेकांवर केले हल्ले, पोलिसांनी केली 11 जणांना अटक

Pune Crime | मुंबई पोलीस दलात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया महिला पोलिसाला अटक

The post Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article