Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | रेल्वे मार्गावर बसू नका, असे काळजीपोटी सांगणार्यास अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने कोयत्याने वार (Attempt To Murder) करुन व दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घोरपडी गावातील (Ghorpadi Gaon) आगवाली चाळ येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडला. (Pune Crime)
याप्रकरणी प्रविण सोपान कांबळे (वय ५२, रा. खराडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६३/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी १७ ते २२ वयोगटातील ५ ते ७ जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अनिकेत प्रविण कांबळे (रा. आगवाली चाळ, घोरपडी गाव) हे १७ ते २२ वयाच्या तीन अनोळखी मुलांना रेल्वे पटरीवर बसू नका, असे सांगितले. त्याचा राग मनात धरुन या मुलांनी आणखी ३ ते ४ मुलांना बोलावून त्यांनी अनिकेत याच्यावर हत्याराने कानाजवळ, छातीवर, मानेवर व त्याच्या तोंडावर दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अनिकेत कांबळे याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Case In Ghorpadi Gaon Mundhwa Area Pune
The post Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.