Header

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’

Sanjay Raut Shivsena leader and mp sajay raut you have 100 fathers there sanjay raut lashed out at the rebellious mlas of shivsena

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Raut | संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा करत आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यातच काल या गटाला ’शिवसेना बाळासाहेब’ असे नाव दिल्याने त्याचे संतप्त पडसाद शिवसेनेत उमटत आहेत. (Sanjay Raut)

 

एकीकडे संतप्त शिवसैनिक बंडखोरांविरूद्ध रस्त्यावर उतरलेले असतानाच नेत्यांनी सुद्धा बंडखोरांवर घणाघात करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना गटाच्या नावावरून सुनावले असतानाच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सुनावले आहे.

 

बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात बंड करणार्‍या आमदारांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर आता हा वाद न्यायालयात गेला आहे. शिंदेगटाने ’शिवसेना बाळासाहेब’ असे नाव दिल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेच्या नावाचा वापर करुन त्यांनी मते मागू नयेत. त्यांनी त्यांच्या बापाचे नाव लावावे, ते स्वत: बाळासाहेबांचे भक्त म्हणतात, पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत. (Sanjay Raut)

 

तुम्ही तुमच्या बापाचे नाव द्या

राऊत यांनी पुढे म्हटले की, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव देण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पण, तुम्ही तुमच्या बापाचे नाव द्या, तुमच्या बापाच्या नावाने पक्ष बनवा आणि बापाच्या नावाने मते मागा.
आमच्या पक्षाचा जो बाप आहे, त्याच्या नावाने का मते मागता. तुम्हाला तर 100 बाप आहेत तिकडे, कोणी दिल्लीत आहे, कोणी नागपुरात आहे, कोणी मुंबईत आहे.

 

तुम्ही 10 वेळा बाप बदलता

अतिशय बोचरी टिका करत राऊत यांनी म्हटले की, आमची निष्ठ ही केवळ बाळासाहेबांवरच आहे, आम्ही त्यांना सोडत नाही.
तुम्ही 10 वेळा बाप बदलता, कधी बडोद्यात जाता, कधी सुरतला जाता, कधी गुवाहाटीला जाता, कधी दिल्लीत जाता.
ही बाप बदलण्याची जी प्रक्रिया आहे, ती आमच्या पक्षात नाही चालत.

 

‘त्या’ आमदारांना परतायचे आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, नुकतेच माझे तिथल्या काही आमदारांशी फोनवरुन बोलणे झाले.
त्या आमदारांना परत यायचे आहे, पण त्यांना येऊ दिले जात नाही. त्यांना जबरदस्तीने डांबून ठेवले आहे. तरीही ते आमदार परत येतील.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and mp sajay raut you have 100 fathers there sanjay raut lashed out at the rebellious mlas of shivsena

 

The post Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article