Header

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रासंबंधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या वक्तव्याचा सर्वच विरोधी पक्षांनी निषेध केला आहे. दरम्यान आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोश्यारी यांना सडेतोड उत्तर दिले आहे (Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari). पवार यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र (Maharashtra) मराठी माणसांनी (Marathi People) घडवला आहे.
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे.
महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्य टाळावीत.
महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ॥ महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ॥, असे अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी…

मुंबईत एका नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की,
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती (Gujarati People) आणि राजस्थानी लोकांना (Rajasthani People) काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी (Financial Capital) म्हटले जाते.
मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही. (Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राज्यपालांनी दिले स्पष्टीकरण…

महाराष्ट्राचा अवमान होईल असे वक्तव्य केल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचे योगदान सर्वाधिक आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो.
त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

 

राज्यपालांनी पुढे म्हटले आहे की, काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता.
केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले.
म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत.
ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत.
त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.

 

Web Title : – Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | bhagat singh koshyari controversial statement over marathi mumbai ncp leader ajit pawar slammed with tweet

 

हे देखील वाचा :

Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज’ – उद्धव ठाकरे

Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर

CM Eknath Shinde On Bhagat Singh Koshyari | राज्यपालांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मराठी माणसाच्या मेहनतीवरच…’

 

The post Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article