Header

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंना इशारा, म्हणाले – ‘आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार’

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंना इशारा, म्हणाले – ‘आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार’

मालेगाव : बहुजननामा ऑनलाइन CM Eknath Shinde | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी पक्षातील बंडखोरीनंतर आक्रमक पवित्रा घेतला असून ते सातत्याने बंडखोर आमदारांवर शाब्दिक प्रहार करत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांचे वाभाडे काढले होते. या वरून आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणावरून शिवसेनेला इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी मालेगावमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही आमचे आई – बाप का काढता ?, सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला ? मलाही आता भूकंप करावा लागेल. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करणार आहे, असा इशारा शिंदे यांनी दिला. (CM Eknath Shinde)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिकवण आहे.
मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आज शिंदे यांनी मालेगावमध्ये (Malegaon) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शिंदे म्हणाले, जनावरांचा मृत्यू झाला असेल, घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल.

 

शिंदे पुढे म्हणाले, वनहक्क पट्टे प्रकरणे युद्ध पातळीवर निकालात काढली पाहिजेत. 36 लाख घरकूल आणि पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिली पाहिजे.
यासाठी कृषी विद्यापिठांना बळकटी द्यावी लागेल. शेतकर्‍यांनी विविध देशातील आणि इतर राज्यांतील शेतकर्‍यांच्या शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
क्लस्टर आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. क्लस्टर शेतीला राज्य शासन प्राधान्य देईल, असे शिंदे म्हणाले.

 

Web Title : – CM Eknath Shinde | i witnessed the incident that happened regarding anand dighe will speak when the time comes said that cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | अजित पवार कोश्यारी यांच्या विधानावर ‘परखड’, म्हणाले – ‘अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी…’

Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज’ – उद्धव ठाकरे

Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर

 

The post CM Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंना इशारा, म्हणाले – ‘आनंद दिघेंबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article