Header

Arpita Mukherjee | 50 कोटी कॅश, अर्धा-अर्धा KG च्या 6 बांगड्या, परदेशी चलन…अर्पिताच्या काळ्या खजिन्यातून आतापर्यंत काय-काय मिळाले ?

Arpita Mukherjee | 50 कोटी कॅश, अर्धा-अर्धा KG च्या 6 बांगड्या, परदेशी चलन…अर्पिताच्या काळ्या खजिन्यातून आतापर्यंत काय-काय मिळाले ?

Arpita Mukherjee | ed recovered 50 crore till now from arpita mukherjee west bengal partha chatterjee

कोलकाता : वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील (Mamata Banerjee Govt) मंत्री पार्थ चॅटर्जी (West Bengal Minister Partha Chatterjee) यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीचे (Arpita Mukherjee) नाव गेल्या आठवडाभरापासून देशभर चर्चेचा विषय आहे. कोणी अर्पिताला धनकन्या म्हणत आहेत, तर कोणी तिला कॅश क्विन म्हणत आहेत. काहीही असले तरी ईडीच्या छाप्यांमध्ये तिच्या घरात ज्या प्रकारे 500-2000 च्या नोटांची बंडले सापडत आहेत, ते पाहून हे नाव अर्पिताला देणे आवश्यक आहे. ईडीने आतापर्यंत अर्पिता मुखर्जीच्या घरातून 50 कोटी रुपये जप्त केले आहेत. एवढेच नाही तर बुधवारी टाकलेल्या छाप्यात ईडीला 4.30 कोटी रुपयांचे सोनेही मिळाले आहे. त्यात साडेचार किलोच्या 6 बांगड्यांचाही समावेश आहे. ईडीला अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणांवरून आतापर्यंत काय – काय मिळाले ते जाणून घेऊया ? (Arpita Mukherjee)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पहिल्या दिवशीच्या छाप्यात काय सापडले ?

ईडीने 23 जुलै रोजी अर्पिताच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. यादरम्यान ED ला सुमारे 21 कोटी रुपये रोख मिळाले होते. एवढेच नाही तर ईडीने अर्पिताच्या घरातून 20 मोबाईल आणि 50 लाख रुपये किमतीचे दागिनेही जप्त केले आहेत. अर्पिताच्या घरातून ईडीला सुमारे 60 लाखांचे विदेशी चलनही मिळाले होते. यानंतर ईडीने अर्पिता मुखर्जीला अटक केली. (Arpita Mukherjee)

 

सुमारे 50 कोटींची रोकड सापडली

अर्पिता मुखर्जीने ईडीच्या चौकशीत तिच्या इतर काही मालमत्तांचा उल्लेख केला होता. यातील एक फ्लॅट कोलकात्याच्या बेलघारिया येथेही होता. ईडीने या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर अर्पिताच्या घरातील टॉयलेटमध्ये जे आढळले ते पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. अर्पिताच्या घरातून ईडीला 27.9 कोटी रुपये सापडले आहेत. त्यात 2000 आणि 5000 रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या नोटा 20-20 लाख आणि 50-50 लाखांच्या बंडलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जर दोन्ही दिवसाच्या कारवाईतील रोख रक्कमेची बेरीज केली तर ती सुमारे 50 कोटी (48.9 कोटी) होते.

 

4.31 कोटी रुपयांचे सोने सापडले

बुधवारी ईडीला अर्पिता मुखर्जीच्या दुसर्‍या फ्लॅटमधूनही मोठ्या प्रमाणात सोने मिळाले. छापेमारीत 4.31 कोटी रुपयांचे सोने सापडल्याचे ईडीने सांगितले. यामध्ये प्रत्येकी 1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा, अर्धा किलोच्या 6 सोन्याच्या बांगड्या आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर या ठिकाणावरून एक सोन्याचे पॅनही सापडले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कसा सापडला ईडीला खजिना ?

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी (Bengal SSC Scam) पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर ईडीने नुकतेच छापे टाकले होते. दरम्यान, ईडीला पार्थ चॅटर्जीच्या घरातून काही पावत्या मिळाल्या होत्या. यामध्ये वन सीआर अर्पिता, फोर सीआर अर्पिता असे लिहिले होते. यावरूनच ईडीला अर्पिता मुखर्जीकडे रोख रक्कम ठेवल्याची कल्पना आली. यानंतर ईडीने अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणांवर छापा टाकून रोख रक्कम जप्त केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी केलेल्या कारवाईदरम्यान एजन्सीला अर्पिताच्या घरातून एक काळी डायरीही सापडली होती. ही डायरी बंगाल सरकारच्या Department of Higher And School Education ची असल्याचे सांगण्यात येत आहे. या डायरीत 40 पाने आहेत, ज्यामध्ये बरेच काही लिहिले आहे. ही डायरी एसएससी घोटाळ्याचे अनेक पदर उघडू शकते.

 

अर्पिताची कबुली

घरातून जप्त केलेली रोकड पार्थचीच असल्याचे अर्पिताने चौकशीदरम्यान कबूल केल्याने पार्थ चॅटर्जीच्या अडचणी आणखी वाढू शकतात, असे मानले जात आहे.
हा पैसा अर्पिता मुखर्जीशी निगडीत कंपन्यांमध्ये गुंतवण्याची योजना होती असा दावाही करण्यात आला आहे.
रोख रक्कमही एक-दोन दिवसांत तिच्या घरातून बाहेर काढण्याची तयारी होती.

 

Web Title : – Arpita Mukherjee | ed recovered 50 crore till now from arpita mukherjee west bengal partha chatterjee

 

हे देखील वाचा :

Immunity Improve | पावसाळ्यात ‘या’ 4 गोष्टींचे सेवन केल्याने पडणार नाही आजारी, जाणून घ्या कशी इम्युनिटी मजबूत

Pune Crime | अवैध धंद्यांबाबत तक्रार केल्याने तरुणाला मारहाण करुन दिली जीवे ठार मारण्याची धमकी; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

Natural Pain Killers | स्वयंपाक घरातील 5 मसाले ‘पेनकिलर’चे करतात काम, जाणून घ्या कसे?

 

The post Arpita Mukherjee | 50 कोटी कॅश, अर्धा-अर्धा KG च्या 6 बांगड्या, परदेशी चलन…अर्पिताच्या काळ्या खजिन्यातून आतापर्यंत काय-काय मिळाले ? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article