Header

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात रिक्षाचा प्रवास आणखी वाढणार? दरवाढीचा पुनर्विचार; जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांना आश्वासन

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात रिक्षाचा प्रवास आणखी वाढणार? दरवाढीचा पुनर्विचार; जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांना आश्वासन

Pune Rickshaw Fare Increase | will rickshaw travel become more expensive reconsideration of rate hike pune collectors assurance

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Rickshaw Fare Increase | सीएनजी दरवाढीचा (CNG Price Hike) थेट फटका आता रिक्षा प्रवाशांना बसणार आहे. इंधनातील दरवाढ लक्षात घेता पुणे (Pune City), पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri-Chinchwad) आणि जिल्ह्यात रिक्षाच्या भाडेवाढीला (Pune Rickshaw Fare Increase) मंजुरी देण्यात आली. मात्र ही दरवाढ कमी असल्याची टीका रिक्षा संघटनांनी केल्याने दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संघटनांना दिले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने (Rickshaw Panchayat Delegation) बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांची भेट घेतली. भाडे वाढीबाबत बी. सी. खटुआ समितीने (B. C. Khatua Committee) कोष्टक तयार केले आहे. त्यातील सुत्रानूसार नवीन भाडेवाढ झाली नाही, अशी तक्रार केली. या शिष्टमंडळात संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, आनंद बेलमकर, सिद्धार्थ चव्हाण यांचा समावेश होता.

 

रिक्षा भाडे दरासाठी प्रति किलोमीटर 14 ऐवजी 15 रुपये केले. म्हणजे एक रुपया दरवाढ केली.
पहिल्या दीड किमीच्या टप्प्यासाठी दोन रुपये म्हणजे 21 ऐवजी 23 रुपये,
तर त्यापुढील प्रत्येक किमीसाठी एक रुपया भाडे वाढ केली. 1 ऑगस्टपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.
मात्र ही दरवाढ (Pune Rickshaw Fare Increase) अतिशय तोडकी आहे.
त्यातच सीएनजी मिळण्यासाठी रिक्षा चालकांना काही तास रांगेत घालवावे लागतात, अशी तक्रार करण्यात आली.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत सीएनजी पुरवठा कंपनी (CNG Supply Company)
अधिकाऱ्यांची बैठक आज (गुरुवार) तातडीने बोलावली आहे. दरवाढीचा अभ्यास करुन
त्याचाही पुनर्विचार करु असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pune Rickshaw Fare Increase | will rickshaw travel become more expensive reconsideration of rate hike pune collectors assurance

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आखाड पार्टीवरुन तरुणाचा खून; पूना हॉस्पिटलजवळील घटना

MP Sanjay Raut |’महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल’, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- ‘शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून…’

Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा

 

The post Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात रिक्षाचा प्रवास आणखी वाढणार? दरवाढीचा पुनर्विचार; जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांना आश्वासन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article