Header

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी केलेल्या पदाची

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी केलेल्या पदाची

CM Eknath Shinde | cm eknath shinde birthday wishes to shivsena chief uddhav thackeray

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुलाखतीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि भाजपवर (BJP) टीका करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही तर माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देतानाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख मानण्यासही नकार दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.
शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून बंडखोर आमदारांना आपली ताकद दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde birthday wishes to shivsena chief uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

MNS | ‘अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेने राज ठाकरेंना दगा दिला’ – संदीप देशपांडे

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीला गती ! पुणे महापालिकेकडून 25 दिवसांत 2256 किलो प्लास्टिक जप्त

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! नायजेरियन दाम्पत्याकडून 1.31 कोटीचे कोकेन, एम.डी जप्त

 

The post CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण चर्चा त्यांनी केलेल्या पदाची appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article