Header

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ncp leader eknath khadse criticizes on cm eknath shinde and devendra fadnavis

जळगाव : बहुजननामा ऑनलाइन Eknath Khadse On Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांनी काल सायंकाळी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी राहतील अशी मोठी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेकांनी उलट प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. (Eknath Khadse On Devendra Fadnavis)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळी बोलताना खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं,” असा टोला त्यांनी लगावला.

 

पुढे खडसे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगलं काम त्यांनी करावं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी,” अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, “देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा आहे. परंतु, पूर्ण ती झालेली नाही.
परिस्थितीनुसार त्यांनी हे पद स्वीकारलं असल्याचा टोलाही यावेळी खडसे यांनी लगावला.
त्याचबरोबर, एकनाथ शिंदे हे कोणत्या पक्षाचे तसेच त्यांनी कोणता पक्ष म्हणून भाजपला पाठिंबा दिला,
यावर विचारले असता खडसे म्हणाले की, ‘याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित आहे.
कोर्टाच्या निकालानंतरच नेमकी खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट होईल,” असं देखील ते म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Eknath Khadse On Devendra Fadnavis | ncp leader eknath khadse criticizes on cm eknath shinde and devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

 

The post Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article