Header

Pune Crime | बोपदेव घाटात दाम्पत्याला लुटले, तलवारीने वार करुन मोबाईल, मंगळसुत्र लुबाडले

Pune Crime | बोपदेव घाटात दाम्पत्याला लुटले, तलवारीने वार करुन मोबाईल, मंगळसुत्र लुबाडले

Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | बोपदेव घाटात (Bopadev Ghat) रात्रीअपरात्री जाणार्‍या येणार्‍यांना लुबाडले जात असल्याने तेथे पोलीस (Pune Police) चौकीची निर्मिती करण्यात आली. असे असतानाही घाटातून जाताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोघांना चोरट्यांनी तलवारीने वार करुन जखमी करुन एका दाम्पत्याला लुबाडल्याचे (Pune Crime) समोर आले आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी बाळु बबन जाधव Balu Baban Jadhav (वय 42, रा. गुजरवाडी, कात्रज-Katraj) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळु जाधव हे पुरंदर तालुक्यातील वाघापूर
या मुळ गावी जाण्यासाठी मोटारसायकलवरून पत्नीसह बोपदेव घाटातून बुधवारी रात्री साडेदहा वाजता जात होते.
वाटेत ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले.
त्यांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तेव्हा बाळु यांनी त्याला प्रतिकार केल्यावर त्यांनी बाळु यांच्या डोक्यात तलवारीने वार करुन जखमी केले.
त्यांच्याकडील मोबाईल आणि पत्नीच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन नेले.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (API Sandeep Madhale) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

 

हे देखील वाचा :

Pune Rain | अखेर तो आला ! खडकवासला धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

 

The post Pune Crime | बोपदेव घाटात दाम्पत्याला लुटले, तलवारीने वार करुन मोबाईल, मंगळसुत्र लुबाडले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article