Header

Pune Crime | गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Pune Crime | गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Pune Crime | Sanjay Sakharam Bunkarmurded at yavat pune rural police

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पुणे जिल्ह्यातील यवत येथील पालखी तळावर एका युवकाचा सपासप वार करुन खून केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा खून (Youth Murder) झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समजू (Pune Crime) शकले नाही. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली.

 

संजय सखाराम बनकर Sanjay Sakharam Bunkar (रा. सोलापुर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. यवतमधील पालखी तळावर असलेल्या शेडमध्ये संजय याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून (Pune Crime) आला. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्यातील (Yawat Police Station) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी काही वेळातच मृत व्यक्तीची ओळख पटवली. शहरातील लोकवस्ती असलेल्या परिसरात ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

मृत संजय बनकर याचे नातेवाईक दौंड तालुक्यातील खामगाव तांबेवाडी येथे राहतात.
संजयच्या पोटावर वार करुन खून करण्यात आला.
त्याचा खून कोणी आणि कोणत्या कारणावरुन केला याचा तपास यवत पोलीस करीत आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar),
पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे (PSI Sanjay Nagargoje), पद्मराज गम्पले, सुजित जगताप यांनी भेट दिली.
याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

 

Web Title : – Pune Crime | Sanjay Sakharam Bunkarmurded at yavat pune rural police

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

 

The post Pune Crime | गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article