Header

MP Sanjay Raut |’महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल’, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- ‘शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून…’

MP Sanjay Raut |’महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल’, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- ‘शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून…’

MP Sanjay Raut | mlas from shinde faction in contact with shivsena there will be change of power in maharashtra claims sanjay raut

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकित शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) संविधानाच्या (Constitution) आणि कायद्याच्या (Law) विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने 16 आमदार (MLA) अपात्र ठरतील असा विश्वास संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) व्यक्त केला. तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या शेड्युल्ड नुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी लगावला. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका केली.

 

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार (Shinde Group MLA) आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना सर्व निवडणुका लढवणार आहे. भाजपला (BJP) शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपचे होते. त्यात जे यश त्यांना आले ते दिर्घकाळ टिकणार नाही.

 

राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली स्वारीवर येणार होते. मात्र अचानक रद्द झालं. गेल्या महिन्याभरातील ही त्यांची पाचवी भेट होती. म्हणजे अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षातून चारवेळाही दिल्लीला आलेले नाहीत. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात पाच वेळा यावं लागत आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या मनात गोंधळ आहे, अशी टीका राऊतांनी केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) आहेत.
उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष, तिरस्कार शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसतोय.
परंतु हा द्वेष, तिरस्कार महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही.
भावनेच्या भरात काहींना फसवून शिंदे गटात सामील केलेय. त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत.
त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल असा दावा संजय राऊतांनी केला.

 

Web Title :- MP Sanjay Raut | mlas from shinde faction in contact with shivsena there will be change of power in maharashtra claims sanjay raut

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :

The post MP Sanjay Raut |’महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल’, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- ‘शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article