Header

Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया

Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Voter ID Link | आता कोणत्याही मतदाराला त्याचे नाव आधारशी जोडायचे असेल तर त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांची नावे आधारशी जोडण्याची मोहीम आजपासून सुरू होत आहे. मात्र, ते पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि मतदारांना तसे करण्यास भाग पाडले जाणार नाही. राज्यांमध्ये, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मतदान केंद्रांवर आणि घरोघरी जाऊन मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक फॉर्म 6 बी गोळा करतील. (Aadhaar Voter ID Link)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आधारसोबत का जोडले जातेय मतदाराचे नाव ?

दोन ठिकाणी कोणीही मतदान करू नये आणि मतदार याद्या स्वच्छ व पारदर्शक व्हाव्यात, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
मतदार स्वत: त्यांचे आधार कार्ड व्होटर अ‍ॅप, व्होटर हेल्पलाइन किंवा भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ऑनलाइन NVSP पोर्टलवर लिंक करू शकतात.
मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्याचे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करावयाची आहे,
त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपली वैयक्तिक जबाबदारी लक्षात घेऊन जिल्हा निवडणूक कार्यालय (निवडणूक तहसीलदार)
यांच्या सहकार्याने आपले मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करावे. (Aadhaar Voter ID Link)

 

हे लोक आधारसोबत जोडण्यास पात्र

नवीन मतदानासाठी, 1 जानेवारी 2023 रोजी ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल आणि त्यांचे नाव प्रकाशित मतदार यादीत नोंदवलेले नसेल,
तर ते बीएलओ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात फॉर्म क्रमांक 6 भरून अर्ज करू शकतात.

मतदार यादीतून कोणत्याही मतदाराचे नाव काढून टाकण्यासाठी, फॉर्म क्रमांक 7, आधार कार्डशी लिंक करण्यासाठी,
फॉर्म क्रमांक 6 आणि प्रकाशित मतदार यादीतील कोणतीही चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी, फॉर्म क्रमांक 8 भरावा लागेल.

तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत तपासू शकता किंवा इतर माहिती https://eci.gov.in या वेबसाइटवर मिळवू शकता आणि मतदार स्वत: साइटवर फॉर्म भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतो.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : – Aadhaar Voter ID Link | aadhaar to voter id link process election commission begin campaign

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून दुकानात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वानवडी पोलिसांकडून एकाला अटक

CM Eknath Shinde | संजय राऊतांना ED कडून अटक ! CM एकनाथ शिंदे म्हणाले – ‘त्यांनी आम्हाला पण तुरुंगात….’

Shivsena | खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, एकनाथ शिंदे यांचं प्रतिज्ञापत्र

Pune Crime | सामाईक भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लंपास; उंड्रीतील घटना, शहरातील तिसरी घटना

 

The post Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article