Header

Pune Crime | अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून दुकानात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वानवडी पोलिसांकडून एकाला अटक

Pune Crime | अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून दुकानात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वानवडी पोलिसांकडून एकाला अटक

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  Pune Crime | कुटुंबियासमवेत कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ११ वर्षाच्या मुलीचा भर दुकानात विनयभंग (Molestation Case) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अब्दुल बाबु शेख Abdul Babu Shaikh (वय ३५, रा. प्रथमा बिल्डिंग, रामटेकडी, हडपसर – Hadapsar) याला अटक केली आहे. हा प्रकार फातिमानगर येथील के पी सी टी मॉलमधील कपड्याच्या विभागात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी वानवडीतील एका ४४ वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०५/२२) दिली आहे. (Crime Against Woman)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या कुटंबियांसमवेत कपडे खरेदी करण्यासाठी के पी सी टी मॉलमध्ये गेले होते. तेथील कपडे विभागात त्यांची ११ वर्षाची मुलगी कपडे पहात असताना अब्दुल शेख हा तेथे आला. तिच्या अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या मुलीच्या आरडाओरडामुळे हा प्रकार इतरांना समजल्यावर त्यांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक गावंडे तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Molestation Case Wanwadi Police Arrest Abdul Babu Shaikh from Ramtekdi Hadapsar

 

हे देखील वाचा :

Shivsena | खरी शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, एकनाथ शिंदे यांचं प्रतिज्ञापत्र

CM Eknath Shinde | संजय राऊतांना ED कडून अटक ! CM एकनाथ शिंदे म्हणाले – ‘त्यांनी आम्हाला पण तुरुंगात….’

Shivsena MP Sanjay Raut Arrest | संसदेचे अधिवेशन सुरु असताना अटक झालेले संजय राऊत पहिलेच खासदार

Sanjay Raut | संजय राऊतांकडे CM एकनाथ शिंदे यांचे 10 लाख रुपये ?, दीपक केसरकर म्हणाले…

 

The post Pune Crime | अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून दुकानात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वानवडी पोलिसांकडून एकाला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article