Header

CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग

CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन शहरातील सीएनजीच्या दरात (CNG Price Hike) पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सीएनजीच्या दरात बुधवारी रात्रीपासून ६ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (Maharashtra Natural Gas Ltd) ने घेतला आहे. त्यामुळे पुणेकर वाहनचालकांना आता एक किलो सीएनजी साठी तब्बल ९१ रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी सीएनजीच्या दरात एकावेळी १२ एप्रिल २०२२ रोजी ५ रुपये ८० पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. (CNG Price Hike) त्यानंतर आज तब्बल ६ रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत.

 

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीची मागणी वाढत आहे. स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) सीएनजीवरील करात कपात केल्याने १ एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचे दर कमी होऊन ते ६२.२० रुपये किलो झाले होते. त्यानंतर गेल्या ४ महिन्यात ७ वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यात तब्बल २८.८० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पर्यावरण पुरक आणि स्वस्त यामुळे अनेकांनी आपली वाहने सीएनजीमध्ये परार्वतित करुन घेतली.
शहरातील सर्व रिक्षा या सीएनजीवर चालतात. या सततच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
त्यामुळे आता रिक्षा पंचायतीने या दरवाढीविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
९ ऑगस्ट रोजी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

Web Title :- CNG Price Hike | CNG price hike: Rs 6 per kg, 29 rupees more expensive in 4 months

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील 10 मोठे निर्णय, मविआला धक्क्यावर धक्के

Maharashtra Cabinet Meeting | शिंदेंचा ठाकरेंना धक्का, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार

Anti Corruption Bureau (ACB) Pune | डी. पी. ओपिनियन देण्यासाठी 3.5 लाखांची मागितली लाच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात

 

The post CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article