Header

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन Maharashtra Cabinet Expansion | राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर जून महिन्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात असलेले महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. तर शिवसेनेत बंड करुन 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या पाठिंब्याने 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची (CM) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अद्याप महाराष्ट्रातील मंत्रिमंडळचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या तर काही नव्या नवांना संधी मिळणार आहे. उद्या, शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटातील (Shinde group) 7 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. भाजपकडे (BJP) स्वत:चे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना (Shivsena) आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याचप्रमाणे मंत्रिमडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागणार आहे.

 

भाजपकडून कोणाला संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe), बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan), नितेश राणे (Nitesh Rane)

 

शिंदे गटाकडून कोणाला संधी मिळणार?
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (uday Samat), दादा भुसे (Dada Bhuse),
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar),
संदीपान भुमरे (Sandipan Bhumare), संजय शिरसाट (Sanjay Shirsat)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अपक्षांपैकी बच्चू कडू (Bachu Kadu) किंवा रवि राणा (Ravi Rana) यांना संधी मिळू शकते,
यात बच्चू कडू यांचं पारडं जड आहे.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadnavis shiv sena bjp government cabinet expansion on 5 august sources

 

हे देखील वाचा :

CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील 10 मोठे निर्णय, मविआला धक्क्यावर धक्के

Maharashtra Cabinet Meeting | शिंदेंचा ठाकरेंना धक्का, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार

 

The post Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article