Header

Fire In Pune | भवानी पेठेत गोदामाला आग लागून बेकरी साहित्य जळून खाक

Fire In Pune | भवानी पेठेत गोदामाला आग लागून बेकरी साहित्य जळून खाक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Fire In Pune | भवानी पेठेतील रोशन मस्जिदजवळ (Roshan Masjid, Bhawani Peth) असलेल्या दोन गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली. त्यात बेकरी साहित्य असलेले गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले. आगीमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या गोदामात वीज मीटर नसतानाही ही आग कशी लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. (Fire In Pune)

 

याबाबत अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील रोशन मस्जिदजवळ गोल्डन सिटी (Golden City) या इमारतीत पत्र्याची दोन गोदामे आहेत. त्यातील बेकरी (Bakery) साहित्य असलेल्या गोदामाला पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी आग लागल्याची खबर मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दोन्ही गोदामे बंद होती. जवानांनी कटरच्या सहाय्याने गोदामाचे शटर उघडून आत पाण्याचा मारा केला. सुमारे १५ मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. (Fire In Pune)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एका गोदामात बेकरीसाठी लागणारे बॉक्सेस व इतर पॉकिंगचे साहित्य होते.
येथे सर्वप्रथम आग लागली. त्याची झळ शेजारच्या कपड्याच्या गोदामाला झळ पोहचली.
वेळीच खबरदारी घेतल्याने कपड्याच्या गोदामाला फारशी झळ बसली नाही.
कपड्याचे काही गठ्ठे जळाले. अन्य गठ्ठे वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या गोदामात एक गॅस सिलिंडरही (Gas Cylinder) आढळून आला.

 

दोन्ही गोदामे बाहेरुन बंद होती. तसेच तेथे वीज कनेक्शनही नव्हते.
त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

 

Web Title :- Fire In Pune | A fire broke out in a godown in Bhawani Peth and the bakery materials were gutted

 

हे देखील वाचा :

Pradeep Patwardhan Passed Away | हसर्‍या चेहर्‍याचा ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धनची चटका लावणारी ‘एक्झीट’; गिरगावातील राहत्या घरी निधन

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

 

The post Fire In Pune | भवानी पेठेत गोदामाला आग लागून बेकरी साहित्य जळून खाक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article