Header

Pradeep Patwardhan Passed Away | हसर्‍या चेहर्‍याचा ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धनची चटका लावणारी ‘एक्झीट’; गिरगावातील राहत्या घरी निधन

Pradeep Patwardhan Passed Away | हसर्‍या चेहर्‍याचा ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धनची चटका लावणारी ‘एक्झीट’; गिरगावातील राहत्या घरी निधन

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Pradeep Patwardhan Passed Away | मोरुची मावशी या गाजलेल्या नाटकात एंट्रीलाच टाळ्या घेणारा चतुरस्त्र अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. मुंबईतील गिरगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्व क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा प्रदीप पटवर्धन याचा मोरुची मावशी हे नाटक चांगलेच गाजले होते. दूरदर्शनवरील गजरा या मलिकेतही त्याने सुरुवातीला काम केले होते. (Pradeep Patwardhan Passed Away)

 

प्रदीप याला नाटकाची आवड होती. महाविद्यालयापासूनच त्याने एकांकिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पर्दापण केले. मोरुची मावशीमधील त्याची भूमिका गाजली होती. नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, भुताळलेला नवरा, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

होल्डिंग बँक, मेनका उर्वशी, थॅक यू विठ्ठला,  जर्नी प्रेमाची, पोलीस लाईन एक पूर्ण सत्या अशा चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती.
प्रदीप पटवर्धन यांची एक्झीट मनाला चटका लावून गेल्याचे अनेकांनी
सोशल मीडियावर पोस्ट टाकून श्रद्धांजली अर्पण करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

Web Title :- Pradeep Patwardhan Passed Away | Pradeep Patwardhan Passed Away In Mumbai

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

 

The post Pradeep Patwardhan Passed Away | हसर्‍या चेहर्‍याचा ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धनची चटका लावणारी ‘एक्झीट’; गिरगावातील राहत्या घरी निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article