LPG Cylinder Price | एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त, जाणून घ्या किती रुपये कपात करण्यात आली?
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – LPG Cylinder Price | महिन्याच्या पहिल्या दिवशी आज (1 ऑगस्ट) व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात (LPG Cylinder Price) 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत 1936.50 रुपये मोजावे लागणार आहे. या किमती दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) ते चेन्नई (Chennai) आणि देशातील इतर शहरांमध्ये लागू झाल्या आहेत. दरम्यान 21 मे पासून देशातील इंधनाचे दर (Fuel Rate) स्थिर आहेत.
दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलेंडर बाबत (Domestic LPG Cylinder) बोलायचे झाले
तर सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे.
यापूर्वी 19 मे रोजी या किमतीत बदल करण्यात आला होता.
त्यानंतर किमती 1003 रुपयांवरुन 1053 रुपये करण्यात आल्या होत्या.
सध्या कोलकात्यात घरगुती एलपीजीची किंमत (LPG Cylinder Price) 1079, मुंबईत 1052 आणि चेन्नईत 1068.50 रुपये आहे.
याशिवाय ऐतिहासिक आकडेवारी पाहिली तर गेल्या
आठ वर्षात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे अडीच पटीने वाढ झाली आहे.
सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन Indian Oil Corporation (आयओसीएल) च्या
आकडेवारीनुसार मार्च 2014 मध्ये अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 410 रुपये होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- LPG Cylinder Price | commercial lpg cylinder orices slashed from today august 1 2022 check latest rates
हे देखील वाचा :
Pune News | ‘शिक्षण हे हुशार होण्याकरिता नसून शहाणे होण्याकरिता असावे’ – डॉ. दिपक शहा
MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा
The post LPG Cylinder Price | एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त, जाणून घ्या किती रुपये कपात करण्यात आली? appeared first on बहुजननामा.