Maharashtra Monsoon Session | आमदार महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली – अमोल मिटकरी
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाचं (Maharashtra Monsoon Session) वातावरण होतं. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे आमदार (Mahavikas Aghadi MLA) पायऱ्यांवर बसून शिंदे गटाला (Shinde Group) 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा देत होते. यावर आज शिंदे गटाने मविआच्या घोटाळ्यांवरुन आंदोलन केले. यावरुन हा वाद उफाळून आला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Monsoon Session)
यानंतर अमोल मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला. शिवसेनेच्या (Shivsena MLA) महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, असे ते म्हणाले. तसेच यानंतर मिटकरी यांनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली.
शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. त्यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला.
अखेर अजित पवार (Ajit Pawar) त्या ठिकाणी आले आणि आम्हाला बाजुला होऊ या म्हणाले.
त्यामुळे आम्ही बाजूला झाल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कुणी अंगावर आलं तर… – शिंदे गटाचा इशारा
हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) म्हणाले, आमच्यावर विरोधक आरोप करत होते.
आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यांवर आंदोलन केले. आम्ही कुणाला पाय लावत नाही.
आम्हाला कुणी लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ.
आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्यात आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले.
आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असंही ते म्हणाले.
त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाही.
Web Title :- Maharashtra Monsoon Session | cm eknath shinde group mla vs ncp mla clashed vidhan sabha adhiveshan mahesh shinde abused pushed serious allegation of ncp mla amol-mitkari
हे देखील वाचा :
The post Maharashtra Monsoon Session | आमदार महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली – अमोल मिटकरी appeared first on बहुजननामा.