Pune Crime | खडकी येथील शाळेतून 5 वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | खडकी येथील एका शाळेत (School In Khadki) एक महिला आली तेव्हा शाळा सुटली होती. तिने शाळेतील शिक्षकांना आपण मुलीची आत्या असल्याचे सांगून पाच वर्षाच्या मुलीचा हात धरुन तिला ती घेऊन जाऊ लागली. तेवढ्यात या मुलीचे वडिल मुलीला घेण्यासाठी शाळेत आले. आपल्या मुलीला घेऊन जाणार्या महिलेला त्यांनी आडविले. तेव्हा तिने मुलीच्याच वडिलांना मी मुलीची आत्या असल्याचे सांगितले. खडकी पोलिसांनी (Khadki Police) या महिलेला अटक केली आहे. (Pune Crime)
छाया युवराज शिरसाठ Chhaya Yuvraj Shirsath (वय २८, रा. अकोला Akola ) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार खडकीतील एका शाळेत मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. याबाबत खडकीतील एका ३५ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही मुळची अकोला येथील राहणारी असून ती मानसिक समस्येने ग्रस्त आहे. ती सोमवारी पुण्यात आली होती. खडकीतील एका सोसायटीमधील एका घराची तिने मध्यरात्री बेल वाजून त्यांना तुमच्याकडे काम असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी सुरक्षारक्षकाला बोलावून तिला बाहेर काढले होते. त्यानंतर ती खडकीतील शाळेत गेली. फिर्यादी यांची ५ वर्षाची मुलगी युकेजी शाळेत शिकते. शाळा सुटल्यावर तिला आणण्यासाठी ते शाळेत गेले होते. तेव्हा या महिलेने शाळेतील शिक्षकांना व तेथील उपस्थित पालकांना आपण मुलीची आत्या आहे, असे सांगून मुलीच्या हाताला धरुन तिला घेऊन ती जाऊ लागली होती. सुदैवाने फिर्यादी हे वेळेवर पोहचले. त्यांनी हा सर्व प्रकार पाहून त्यांनी आपल्या मुलीला ताब्यात घेऊन या महिलेला पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt to abduct a 5 year old girl from school in Khadki
हे देखील वाचा :
Maharashtra Monsoon Session | आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली – भरत गोगावले
The post Pune Crime | खडकी येथील शाळेतून 5 वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.