Header

Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर (Shivsena Election Symbol) कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. परंतु या प्रकरणी निवडणूक आयोग (Election Commission) सुनावणी घेऊ शकतो. मात्र निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने (Maharashtra Politics) म्हटले. तर आमदारांच्या अपात्रतेसह (MLA Disqualified) इतर मुद्यांवर प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी आठ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण घटना पीठाकडे (Constitution Bench) पाठवायचे का, याचा निर्णय सोमवारी होणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कोर्टात काय घडलं?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने (Central Election Commission) ज्येष्ठ वकील अरविंद दातार (Senior Advocate Arvind Datar) यांनी बाजू मांडली. सरन्याधीशांनी कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांना विचारले की, हा मुद्दा राजकीय संबंधित आहेत. आपण निवडणूक आयोगाला त्यांच्यासमोर आलेल्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यापासून रोखू शकतो का, असा प्रश्न केला. यावर सिब्बल यांनी बंडखोरांना आम्ही पक्षाचे सदस्य मानत नसल्याचे सांगितले. (Maharashtra Politics)

 

 

सगळे आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगासमोर कोणता दावा करणार असा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला.
तर निवडणूक आयोगाने पक्षाचे आमदार नसणे आणि पक्षाचे सदस्य असणे यात फरक असल्याचे अ‍ॅड. दातार यांनी म्हटले.
दहावी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था असल्याचे अ‍ॅड. अरविंद दातार यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तर दुसरीकडे शिंदे गटाचे (Shinde Group) अ‍ॅड. साळवे (Adv. Salve) यांनी म्हटले की आम्ही अपात्र ठरलो तरी पक्षाचे सदस्य आहोत.
त्यामुळे पक्षावरील दावा आमचा कायम असल्याचे त्यांनी म्हटले.
या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.

 

Web Title :- Maharashtra Politics | maharashtra politics supreme court direct to election commission of india dont take any decision on shivsena election symbol

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली! उद्या होणार राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? ही नावं निश्चित

CNG Price Hike | सीएनजीच्या दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीतील 10 मोठे निर्णय, मविआला धक्क्यावर धक्के

 

The post Maharashtra Politics | शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article