Header

Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा

Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहत असताना एका नराधमाने महिलेच्या १३ वर्षाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) सूर्यसेन जयवंतराव पवार Suryasen Jaywantrao Pawar (वय ४५, रा. थोरातांचा वाडा, नारायण पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Baug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३४/२२) दिली आहे. हा प्रकार २०१६ ते २०१७ दरम्यान घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपी सूर्यसेन पवार याच्या ओळखीचा असून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी शाळेतून घरी आली असताना कपडे बदलताना पाहून तो तिचे सर्व कपडे काढून तिच्याशी अश्लिल चाळे करीत असे.
तिच्यावर लैगिक अत्याचार (Sexual Abuse) करत असत.
तुझ्या आईला सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारुन टाकेन, अशी तिला धमकी (Threat) देऊन वारंवार लैगिक अत्याचार करत असे.
तिचे तोंड दाबून ठेवून लाथा बुक्यांनी मारहाण (Beating) करुन तिच्या डोळ्याचे खाली स्टीलचे उलतन्याने तिला चटका दिला.
आता ते वेगळे राहू लागल्यानंतर हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक साळुंखे (PSI Salunkhe) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Woman’s 13-year-old daughter assaulted while living in ‘live-in’; Crime against Suryasen Pawar in Narayan Peth

 

हे देखील वाचा :

Pune Ganeshotsav 2022 | पुण्यात गणपती मुर्ती विक्रीचे 249 अनधिकृत स्टॉल; अनधिकृत विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करणार – माधव जगताप

Pune Ganeshotsav 2022 | गणेशोत्सवानिमित्त पुण्यात ‘या’ दिवशी मद्य विक्री बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mohit Kamboj | भाजप नेत्यांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

 

The post Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article