Pune Crime | दारु पिताना हरविली चावी चाकूने केला वार; हिंगणे येथील प्रकार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | हिंगणे येथील (Hingne Area) गायत्रीदेवी मंदिराच्या वर डोंगरावर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन गटात मोटारसायकलची चावी हरविल्यावरुन झालेल्या वादात दोघांनी एकावर चाकूने वार करुन गंभीर जखमी (Attempt To Murder) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Raod Police) दोघांना अटक केली आहे. मुकुंद राजगुरु (रा. तुकाईनगर, हिंगणे) आणि पंकज तावरे (रा. समर्थनगर, हिंगणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी स्वप्निल सुनिल हराडे (वय २८, रा. विश्रांतीनगर, वडगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३७२/२२) दिली आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र चेतन तिवारी हे दारू पिण्यासाठी गायत्रीदेवी मंदिराच्या वरील डोंगरावर गेले होते.
तेथे आरोपी हेही दारु पिण्यासाठी बसले होते. चेतन तिवारी याच्या मोटारसायकलची चावी हरविल्याच्या कारणावरुन त्याने मोठ मोठ्याने शिवीगाळ केली.
त्यावरुन राजगुरु व इतरांनी चेतन याच्याशी वाद घातला. त्याला शिवीगाळ करुन धमकी दिली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पंकज तावरे याने त्याच्याकडील चाकूने चेतन याच्या तोंडावर वार करुन त्याचा ओठ कापून त्याला जबर जखमी केले.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहार तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Pune Crime | lost key while drinking stabbed Type from Hingane
हे देखील वाचा :
The post Pune Crime | दारु पिताना हरविली चावी चाकूने केला वार; हिंगणे येथील प्रकार appeared first on बहुजननामा.