Header

Pune Crime | जबरदस्तीने पैसे घेणार्‍या सावकाराविरूध्द खंडणीचा गुन्हा; चंदननगर पोलीस ठाण्यात शुभम जाधव आणि आशिष (अशोक) गायकवाड यांच्यावर FIR

Pune Crime | जबरदस्तीने पैसे घेणार्‍या सावकाराविरूध्द खंडणीचा गुन्हा; चंदननगर पोलीस ठाण्यात शुभम जाधव आणि आशिष (अशोक) गायकवाड यांच्यावर FIR

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही डांबून ठेवून जबरदस्तीने २० हजार रुपये व कोरे चेक घेणार्‍या सावकार (Money Lenders Pune) व त्याच्या मामावर चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अक्षय अशोक आबनावे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम धनंजय जाधव Shubham Dhananjay Jadhav (वय २६, रा. आंबेडकर वसाहत, बारामती – Baramati) आणि आशिष/अशोक मुरलीधन गायकवाड Ashok Ashish Muralidhan Gaikwad (रा. मुंढवा ब्रीजवळ, चंदननगर – Mundhwa Bridge) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत घडला. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी शुभम जाधव याच्याकडून १० टक्के व्याजाने २० हजार रुपये घेतले होते.
त्या बदल्यात त्यांनी ३२ हजार ५०० रुपये गुगल पे, फोन पेने दिले.
असे असताना जाधव व त्याचा मामा आशीष गायकवाड यांच्याकडून ४० हजार रुपये घेतले नाही.
तरीही खराडीतील साईनाथनगर येथील कार्यालयात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला डांबून ठेवले.
त्यांच्याकडून बळजबरीने फोन पे द्वारे २० हजार रुपये घेतले.
तसेच कोरे चेक घेऊन व्याजाची रक्कम ६० हजार रुपये ठरवून ती न दिल्यास येण्याची धमकी देत आहेत.
त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली़ सहायक पोलीस निरीक्षक गोलांडे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Crime of extortion against a moneylender; FIR against Shubham Jadhav and Ashish (Ashok) Gaikwad at Chandannagar Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अजित नागरी पतसंस्थेच्या मॅनेजरनेच घातला गंडा; अभिषेक चोरघडे, अभिजित बनसोडे यांच्याविरुद्ध FIR

Pune Crime | विनयभंगाची तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणीने पोलीस चौकीत केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडीत संदीप घुले विरुद्ध FIR

 

The post Pune Crime | जबरदस्तीने पैसे घेणार्‍या सावकाराविरूध्द खंडणीचा गुन्हा; चंदननगर पोलीस ठाण्यात शुभम जाधव आणि आशिष (अशोक) गायकवाड यांच्यावर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article