Header

Pune Crime | सामाईक भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लंपास; उंड्रीतील घटना, शहरातील तिसरी घटना

Pune Crime | सामाईक भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लंपास; उंड्रीतील घटना, शहरातील तिसरी घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | शाळा आणि दुकानाची सामाईक भिंत फोडून चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानात (Jewelers Shop) प्रवेश करुन चांदीचे दागिने (Silver Jewelry) तसेच दुकानातील डीव्हीआरही चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी मालमसिंह पिरसिंह राठोड (Malamsingh Pirsingh Rathod) (वय ४२, रा. शिवशंभुनगर, कोंढवा kondhwa) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८८/२२) दिली आहे. हा प्रकार उंड्री येथील न्यू खिमंडे ज्वेलर्स (New Khimande Jewellers) या दुकानात शनिवारी रात्री साडेआठ ते रविवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांचे उंड्री (Undri, Pune) चौकात न्यु खिमंडे ज्वेलर्स हे दुकान आहे.
या दुकानाची व शाळेची सामाईक भिंत आहे. शनिवारी रात्री ते दुकान बंद करुन घरी गेले होते.
रविवारी सकाळी त्यांनी दुकान उघडले. तेव्हा हा प्रकार समोर आला.
चोरट्यांनी शाळेची व दुकानाची सामाईक भिंत तोडून दुकानात प्रवेश केला.
दुकानातील ४९४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व डीव्हीआर असा एकूण ३ लाख ११ हजार ४०० रुपयांचा माल चोरुन नेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Deputy Commissioner of Police Namrata Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी घटनास्थळी भेट दिली.
श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वगरे (Sub-Inspector of Police Wagare) तपास करीत आहेत.

 

Web Title : – Pune Crime | Looming jewelery from a jewelers shop by breaking the common wall Incident in Undri third incident in the city

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मम्मी’ला कापून टाकण्याची धमकी देऊन 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात FIR

Pune PMC News | पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र राउत आणि आयुक्तांचे मुख्य सचिव गजानन कडक सेवानिवृत्त

LPG Cylinder Price | एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त, जाणून घ्या किती रुपये कपात करण्यात आली?

NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 

The post Pune Crime | सामाईक भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने लंपास; उंड्रीतील घटना, शहरातील तिसरी घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article