Header

BJP MLA Gopichand Padalkar | श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

BJP MLA Gopichand Padalkar | श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –  भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी भाजपच्या बारामती दौऱ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज गणपती विसर्जन (Ganpati Immersion) आहे. 2024 साली पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) बारामतीत आले आहेत, असं गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी म्हटले. तसेच निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) या बिन टाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणारही नाही, असा टोला पडळकर यांनी लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एखाद्याला फसवून लुबाडून घेण्यात बारामतीकरांना (Baramati) फार आनंद असतो. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi government) आलं तेव्हा सुप्रिया सुळे (Supriya Sule) या वरमाई सारख्या फिरत होत्या. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे परवारांना आता पळून जावं लागणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) यांना देता आलं नाही. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्तेत आलं की परत मिळवलं, असही गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) म्हणाले.

 

 

हा बालेकिल्ला नाही तर साधी टेकडी

बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी असल्याचे पडळकर म्हणाले.
मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते.
माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले.
अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना सत्तेत बसून द्यायचं नव्हतं.
तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दु:ख असल्याचा टोला पडळकरांनी लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान होत असल्याचे पडळकरांनी सांगितले.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिले नव्हते.
आता बावनकुळे हे 288 मतदारसंघात तिकीट वाटप करणार असल्याचे पडळकरांनी सांगितले.

 

Web Title :- BJP MLA Gopichand Padalkar | BJP MLA gopichand padalkar taunts pawar family over chandrashekhar bawankule baramati visit

 

हे देखील वाचा :

Pineapple Benefits in Reducing Cholesterol | अननस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते का? येथे जाणून घ्या फायदे-नुकसान

Gulabrao Patil | ‘आजपर्यंत एक नेता म्हणून इज्जत ठेवली, नाहीतर…’ गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा (व्हिडीओ)

Rashmi Bagal | रश्मी बागल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार? त्यांच्यावर होता उध्दव ठाकरेंचा ‘विश्वास’

 

The post BJP MLA Gopichand Padalkar | श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article