Header

Pune ACB Trap | 7000 रुपयाची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह दोघांना अटक

Pune ACB Trap | 7000 रुपयाची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह दोघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  Pune ACB Trap | ताब्यात घेतलेल्या मोटारसायकलवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच (Bribe) मागून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका वार्डनसह पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहाथ पकडले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब अंबादास जायभाय Appasaheb Ambadas Jaibhai (वय ३२) आणि वॉर्डन किशोर भगवान चौगुले Kishore Bhagwan Chaugule (वय ४३) असे अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

 

 

याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मोटारसायकल चाकण वाहतूक विभागाने (Chakan Transport Department) ताब्यात घेतली होती. या मोटारसायकलवर कारवाई न करता परत देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब जायभाय याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी (Anti Corruption Bureau Pune) संपर्क साधला. त्यानंतर मंगळवारी त्याची पडताळणी करण्यात आली. तेव्हा जायभाय याने तडजोड करीत ७ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्याला वॉर्डन किशोर चौगुले याने साथ दिली.

 

 

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक
सुरज गुरव (ASP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस
आयुक्त शितल घोगरे (ACP Shital Ghogare), पोलीस अंमलदार रियाज
शेख, सौरभ महाशब्दे, चंद्रकांत कदम या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना
दोघांना पकडण्यात आले.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune ACB Trap | Two arrested, including a policeman in seven thousands bribe case

 

हे देखील वाचा :

Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड

MNS-Shinde Group Alliance | हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र येत असतील तर हे नैसर्गिक आहे, शिंद गटाच्या प्रवक्त्यांचे मनसे-शिंदे गट युतीचे संकेत

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात वृद्ध महिलेचा तिच्या मुलाने व नातवाने कट रचून केला खून, मृतदेहाचे तुकडे करुन फेकले मुळा-मुठा नदीत

 

The post Pune ACB Trap | 7000 रुपयाची लाच घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍यासह दोघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article