Header

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CM Eknath Shinde On Shivsena | देशातील शिवसेनेचे 13 राज्यांमधील राज्यप्रमुखांची सभा बुधवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे. (CM Eknath Shinde On Shivsena)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) बोलत होते हिंदुत्वाचा निखारा विजू नये यासाठी आम्ही वेगळे झालो आहोत सत्तेसाठी आम्ही वेगळे झालेले नाही, असे मत त्यांनी स्पष्ट केले. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या (Balasaheb) विचारांशी प्रतारणा केली. ही प्रतारणा कुठेतरी मला व शिवसैनिकांच्या मनात खूपत होती. मात्र या शिवसैनिकांचे बोलणे कोणीही ऐकून घेत नसल्याने त्यांचे दुःख ते माझ्यासमोर येऊन व्यक्त करत होते. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी आम्ही वेगळे झालो आहोत सत्तेसाठी आम्ही वेगळे नाही झालो. सत्तेसाठी वेगळे झालो असतो तर आज माझ्या सोबत अनेक शिवसैनिकांनी आपले मंत्रिपद लाथाडून माझ्यासोबत उभे आहेत.

 

माझ्यावर कंत्राटदार मुख्यमंत्री (Contractor CM) असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. तर मी तेही मान्य करेन, कारण मी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे कंत्राट घेतले आहे, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचे कंत्राट घेतले आहे, तर वृद्धांना मदत करण्याचे कंत्राट मी घेतले आहे.
यासाठी कोणी मला काय म्हणेल याकडे माझे लक्ष नसून माझ्या कामावर माझे लक्ष असेल.

 

काहींनी आम्हाला बाप पळवणाऱ्यांची औलाद या शब्दाचा उल्लेख केला आहे.
मात्र आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत.
जर आम्ही बाप पळवणाऱ्याची औलाद असो तर तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष पळवणारी टोळी नाही का?
जात जात त्यांनी किमान अडीच वर्षांनी तरी गटप्रमुखांना अच्छे दिन आले असल्याचा टोला लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde On Shivsena | shiv sena is not a private company of any family; cm eknath shinde on shivsena chief uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Congress | अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा नकार! आता ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगणार काँग्रेस अध्यक्षपदाची रस्सीखेच

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघेजण सापडले तर तिसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु

Pune Crime | वीज कट केल्याने महावितरणच्या अधिकार्‍याला बेदम मारहाण, केले फ्रॅक्चर

 

The post CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article