Header

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांची काल मुंबईत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप (BJP) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरेंच्या टीकेला आणि आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावेळी राजीनामा (Resignation) का दिला नाही. त्यावेळी निवडणुका (Elections) का घेतल्या नाहीत? असा थेट सवाल फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कालचं भाषण म्हणजे, निराशेचं होतं, माझा त्यांना सवाल आहे की, आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यावेळी राजीनामा का दिला नाही. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाहीत. तुम्ही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो वापरुन निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे द्यायचे होते आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवायचं होतं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.

 

https://ift.tt/ndhLVR6

 

 

 

मला संपवण्याचा प्रयत्न केला पण…

 

मला असं वाटतं, त्यांचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. ते असंही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असेल, पण ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है’, तुम्ही 2019 ला माझा शेवट होणार असं म्हणून प्रयत्न केला. तिघांनाही मिळून मला संपवण्यासाठी अडीच वर्ष प्रयत्न केले, पण कुणीही मला संपवू शकलं नाही,अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis on shivsena chief uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Hardik Pandya | हार्दिक पांड्यामुळे बिहारच्या ‘या’ तरुणाचे बदलले नशीब, रातोरात बनला कोट्याधीश

Sharad Pawar On Raj Thackeray | मनसेच्या टीकेनंतर शरद पवारांनी मोजक्या शब्दात राज ठाकरेंना सुनावले; म्हणाले – हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…

Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन महिलेवर अत्याचार करुन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

 

The post Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article