Header

Pune Crime | पेट्रोलची नशा? 5 अल्पवयीन मुलांकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड परिसरातील घटना

Pune Crime | पेट्रोलची नशा? 5 अल्पवयीन मुलांकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime | लहान वयात पेट्रोलची नशा करीत असल्याचे पाहून एका तरुणाने त्यांना हटकले. पाठीत हाताने फटका मारुन त्यांना असे न करण्यास सांगितले. याचा राग मनात धरुन १३ ते १६ वर्षाच्या पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन (Attempt To Murder) जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

 

याप्रकरणी आदेश सुरेश सोनवणे (वय ३०, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Raod Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका १३ वर्षाच्या मुलाला पेट्रोलची नशा करीत असताना हटकले व पाठीत हाताने फटका मारुन असे व्यसन न करण्यास सांगितले होते.
फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या घराजवळील शौकीन पान शॉपजवळ उभे होते.
त्यावेळी हा मुलगा इतर साथीदारांना घेऊन आला. त्याने “काय रे दादा ओळखलस का मला” असे म्हणाला.
त्यांच्याबरोबरच्या एका १६ वर्षाच्या मुलाने कंबरेमध्ये खोवलेला कोयता काढून अचानक फिर्यादी यांच्या
डोक्यावर वार केला. तो त्यांनी उजव्या हाताने अडविला. दुसर्‍या मुलाने पाठीमागून त्यांच्या डोक्यावर वार केला.
“आज याला जिवंत सोडायचा नाय, मारुन टाका, आमच्या नादाला लागतो काय” असे म्हणून त्यांच्यावर वार केले.
पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Incident In Sinhagad Road Police Station Area Case Registered On Five Minor boys

 

हे देखील वाचा :

Bug In Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या धोकादायक बग बाबत CERT ने जारी केला अलर्ट, डाटा लीक होण्याचा धोका

Pune Crime | मुलाकडून आईच्या खूनाचा प्रयत्न, लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime | फ्लेक्सवर माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शेजारी फोटो न लावल्याने लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण

Pune Accident News | हडपसरमध्ये भीषण अपघात ! मिक्सर कंटेनरने 4 रिक्षा आणि कारला दिली धडक; 1 ठार तर 3 जखमी

 

The post Pune Crime | पेट्रोलची नशा? 5 अल्पवयीन मुलांकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article