Header

Pune Crime | मुलाकडून आईच्या खूनाचा प्रयत्न, लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime | मुलाकडून आईच्या खूनाचा प्रयत्न, लोणीकाळभोर परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime | कोणताही काम धंदा न करता दारुसाठी आपल्या प्रत्यक्ष आईवरच चाकूने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कदमवाक वस्तीत (Kadamwak Vasti, Lonikalbhor) घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (LoniKalbhor Police) अभिजित गोपीचंद दरेकर (वय ३२, रा. बालाजी हाईटस, संभाजीनगर, कदमवाकवस्ती) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी सिंधु गोपीचंद दरेकर (वय ५०, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५१८/२२) दिली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिजित हा फिर्यादी सिंधु दरेकर यांचा मुलगा आहे. त्याला दारूचे व्यसन असून तो काही काम धंदा करीत नाही. बुधवारी सायंकाळी सव्वा सात वाजता तो त्यांच्या घरी आला. फिर्यादी व त्यांची सून मनिषा यांना शिवीगाळ केली. तुम्हाला लय मस्ती आली काय, मी आज तुम्हाला जिवंत सोडत नाही, असे म्हणून देवघरातील चाकू घेऊन त्याने आपल्याच आईच्या डोक्यात वार केला. देवघरातील पाणी प्यायचा तांब्या घेऊन त्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अभिजित दरेकर याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Attempted murder of mother by son, incident in Lonikalbhor area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फ्लेक्सवर माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शेजारी फोटो न लावल्याने लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण

Pune Accident News | हडपसरमध्ये भीषण अपघात ! मिक्सर कंटेनरने 4 रिक्षा आणि कारला दिली धडक; 1 ठार तर 3 जखमी

Maharashtra Police | तब्बल 9 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ते झाले पोलीस उपनिरीक्षक; 44 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

Pune PMC News | टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाला प्राधान्य देणार; भूसंपादनाशिवाय पुढील रस्त्याचे काम केले जाणार नाही – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

 

The post Pune Crime | मुलाकडून आईच्या खूनाचा प्रयत्न, लोणीकाळभोर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article