Header

Pune Pimpri Crime | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना

Pune Pimpri Crime | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime  | अल्पवयीन मुलीच्या (Minor Girl) इन्स्टाग्राम अकाउंटवर मेसेज करुन तिचा पाठलाग करत भर रस्त्यातच मिठी मारुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Pune Police) 19 वर्षाच्या आरोपीविरुद्ध आयपीसी 354, 354(अ), 354(ड) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन बेड्या (Pune Pimpri Crime) ठोकल्या आहेत.

 

 

अभिषेक अंकुश सोनमणकर Abhishek Ankush Sonmankar (वय-19 रा. इंदिरा हायस्कूलच्या बाजूला, वाकड) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने रविवारी  (दि. 4) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 12 जून 2022 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ताथवडे रोडवर घडला. (Pune Pimpri Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर (PSI Chhaya Borkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर मैत्री करण्याचे मेसेज केले.
घटनेच्या दिवशी रात्री सव्वादहाच्या सुमारास पीडित मुलगी ताथवडे रोडने जात होती.
त्यावेळी आरोपीने मुलीला आवाज देऊन ‘थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणला. मात्र मुलीने त्याकडे दुर्लक्ष करुन निघून जाऊ लागली.
आरोपीने पाठलाग करुन रस्त्यावर तिचा हात पकडून ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबाईल नंबर दे’ असे म्हणत मीठी मारुन तिचा विनयभंग केला.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर करीत आहेत.

 

Web Title:  Pune Pimpri Crime  | ‘I like you very much, give me your mobile number’! A minor girl was molested by hugging, an incident in Hinjewadi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सोन्याच्या चीपचा मोह पडला महागात; सोन्याच्या चीपसाठी मंगळसुत्र केले चोरट्यांच्या हवाली

Pune Crime | दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार्‍यांचे मोबाईल चोरणारी आंध्र प्रदेशातील महिलांची टोळी जेरबंद

Pune Crime | भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीवर कारवाई; पबवर छापा टाकून गुन्हे शाखेची कारवाई

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

 

The post Pune Pimpri Crime | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article