Shahajibapu Patil | ‘काय दारु…काय चकणा.. समदं कसं ओके’, युवासेनेचा शहाजीबापूंना टोला
पंढरपूर : बहुजननामा ऑनलाइन – काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल.. या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आता राज्यभर प्रसिद्ध झाले आहेत. सभेत बोलताना शिवसेनेवर (Shivsena) टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या डायलॉगवरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा… काय दारु… काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके… आहे तर आधी याच खोक्यातून बायकोसाठी साडी घेऊन या असा सल्लाही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
युवासेनेचे (Yuva Sena) पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख गणेश इंगोले (Ganesh Ingole) यांनी सोशल मीडियातून शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियात त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. शहाजीबापू यांच्या टीकेमुळे शिवसेनेतील पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं होतं, की उद्धवसाहेब (Uddhav Thackeray) आणि आदित्य साहेबांना (Aditya Thackeray) सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर जितकं लक्ष ठेवायचं तितकं ठेवा आणि मला पाडायचं असेल तर पाडा, असं चॅलेंज त्यांनी ठाकरे यांना दिलं होतं. यावरुनच युवासेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख गणेश इंगोले यांनी सोशल मीडियातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हटलं पोस्टमध्ये ?
बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा. काय दारु…काय चकणा.. काय ते 50 खोके समदं कसं ओके.
बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर (Matoshree) नोकरी भेटेल.
आम्ही शिवसैनिक (Shiv Sainik) तुमची शिफारस करु, टक्केवारी घेऊन आधी स्वत:चं घर पूर्ण करा.
स्वत:च्या बायकोला 50 खोक्यातून साडी घेऊन द्या,
अशी बोचरी टिका करणारी पोस्ट पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shahajibapu Patil | shivsena slams shahajibapu patil over his statement about shivsena chief uddhav thackeray
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | गैरवर्तन करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या घरमालकावर FIR
Mumbai Police | नौदल आणि सीआयएसएफच्या जवानांकडून मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय
The post Shahajibapu Patil | ‘काय दारु…काय चकणा.. समदं कसं ओके’, युवासेनेचा शहाजीबापूंना टोला appeared first on बहुजननामा.