Header

Pune Pimpri Crime | गैरवर्तन करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या घरमालकावर FIR

Pune Pimpri Crime | गैरवर्तन करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या घरमालकावर FIR

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन Pune Pimpri Crime | महिलेसोबत गैरवर्तन (Abuse) करुन तिला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देणाऱ्या घरमालक (Home Owner) आणि त्याच्या अल्पवयीन (Minor) मुलावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) मोरेवस्ती चिखली येथे मंगळवारी (दि.30 ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. आरोपींवर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत 27 वर्षाच्या महिलेने बुधवारी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घरमालक (वय – 45) आणि त्याचा अल्पवयीन मुलगा (वय – 16) यांच्यावर आयपीसी 354, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आरोपीच्या घरात भाड्याने राहतात. फिर्यादी यांचे घरमालकाच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादी या वाळत घातलेले कपडे काढत होत्या. त्यावेळी आरोपी घरमालक व त्याचा मुलगा फिर्यादी यांच्याजवळ आले. घर मालकाने पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना मारहाण (Beating) केली. तसेच साडीचा पदर ओढत त्यांना धक्काबुक्की केली. तर अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सय्यद (API Sayyid) करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Pimpri Crime | Threatened to kill woman by abuse FIR against landlord who molested her

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | नौदल आणि सीआयएसएफच्या जवानांकडून मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय

Pune Crime | विमाननगर परिसरात जबरदस्तीने हप्ता वसुली करणार्‍या टोळक्यांवर खंडणीचा गुन्हा

 

The post Pune Pimpri Crime | गैरवर्तन करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या घरमालकावर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article