Header

Shobha R Dhariwal | ‘आपेगांव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण करणार’ – शोभा आर धारीवाल

Shobha R Dhariwal | ‘आपेगांव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण करणार’ – शोभा आर धारीवाल

बहुजननामा ऑनलाइन Shobha R Dhariwal | भागवत सांप्रदायाचे प्रवर्तक, योगी व महाराष्ट्रातील श्रद्धास्थान श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतोक्तर रोप्ये मौहत्सव संजीवन समाधी सोहळा निमित्त आर एम डी फाऊंडेशन (RMD Foundation) द्वारा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण करण्यात येईल अशी माहिती आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल यांनी दिली. (Shobha R Dhariwal)

 

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील किर्तन सभागृह त्यामधील संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांच्या जिवनावर आधारित प्रसंगाचे जसे की, वडील विठ्ठलपंत व आई रुख्मिनीमाता सह भावंडे, रेड्यामुखी वेद वदविला, चारही भावंडं आपेगांव वरून पैठणला जातांना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, भिंत चालविली, ज्ञानेश्वरी लिखाण, व संजीवन समाधी इत्यादी बाबतचा देखावा तसेच मंदिरातील खांबाचे नक्षीकाम व रंगरंगोटी इत्यादी कामासाठी लागणाऱ्या निधीस मंजुरी दिली असून अग्रीम स्वरूपातील धनादेश नुकताच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आपेगांवचे विश्वस्त यांना प्रदान करण्यात आला आहे.
याआधीही २०१४ मध्ये माणिकचंद समूहाचे संस्थापक व आर एम डी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल
यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मगांव आपेगांव प्रवेशद्वार उभारण्यास निधी दिला होता.

 

Web Title :- Shobha R Dhariwal | ‘Sant Dnyaneshwar Maharaj Temple at Apegaon will soon complete the beautification of the auditorium’ – Shobha R Dhariwal

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :

The post Shobha R Dhariwal | ‘आपेगांव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण करणार’ – शोभा आर धारीवाल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article