Header

Pune Crime | व्यापार्‍याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | व्यापार्‍याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रात्रीच्या वेळी कॅश घेऊन जाणार्‍या व्यापार्‍याला वाटेत गाठून त्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आमान समीर शेख (वय २२), अमीर समीर शेख (वय २०), अमोल अनिल अंबवने (वय २०, तिघे रा. काशेवाडी, भवानी पेठ), शाहरुख दाऊद सय्यद (वय २६, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), सादीक अमीर शेख (वय २५, रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी पोलीस हवालदार अजय ज्ञानराज थोरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२२)
दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी
भवानी पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी शंकरशेठ रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर काही जण हत्यारासह जमले असल्याची
माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून कोयत्यासह दरोड्याची साधने जप्त केली आहे़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर दुकाने बंद करुन कॅश घेऊन
जाणार्‍या एका व्यापार्‍याकडील रोकड लुटण्यासाठी ते तयारीत होते, असे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Criminals who were preparing to rob a merchant were arrested by the crime branch

 

हे देखील वाचा :

Shobha R Dhariwal | ‘आपेगांव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण लवकरच पूर्ण करणार’ – शोभा आर धारीवाल

BJP MLA Ashish Shelar | ‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’, अमित शहांना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं; आशिष शेलारांचा टोला (व्हिडीओ)

ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषकातील संघ, वेळापत्रक ! पॉईंट्स सिस्टीम अन् नियम सर्वकाही एकाच ठिकाणी

 

The post Pune Crime | व्यापार्‍याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article