Header

Video Viral News | संतापजनक ! शौचालयातील फरशीवर कबड्डीपटूंसाठी ठेवण्यात आले जेवण, सोशल मीडियावर Video व्हायरल

Video Viral News | संतापजनक ! शौचालयातील फरशीवर कबड्डीपटूंसाठी ठेवण्यात आले जेवण, सोशल मीडियावर Video व्हायरल

लखनऊ : वृत्तसंस्था – Video Viral News | सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊच्या सहारनपूरच्या आंबेडकर स्पोर्ट्स स्टेडियममधील आहे. या व्हिडिओमध्ये राज्य कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहारनपूरमध्ये आलेल्या खेळाडूंसाठी तयार केलेलं जेवण स्टेडियमच्या टॉयलेटमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली होती. (Video Viral News)

या राज्य कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र यांना देण्यात येणारे जेवण हे स्विमिंग पुलच्या आवारात तयार केले जात होते तर शिजवलेले अन्न हे चक्क शौचालयात ठेवण्यात आले होते. या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने अन्न हे शौचालयात ठेवण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. (Video Viral News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

काय आहे संपूर्ण प्रकार?

 

युपी क्रीडा निदेशालयाच्या अंतर्गत युपी कबड्डी असोसिएशन यांच्या मार्फत डॉ.भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियमवर सब ज्युनियर मुलींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण17 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकाराबाबत क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, भात निकृष्ट दर्जाचा आला होता. जो स्वयंपाक करताना नीट शिजला नव्हता. अशा स्थितीत हा तांदूळ तात्काळ दुकानात परत पाठण्यात आला आणि नवीन तांदूळ मागण्यात आला. तसेच स्टेडियमच्या काही भागाचे बांधकाम सुरू असल्यामुळे हा गोंधळ उडाला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Video Viral News | food served to kabaddi players was kept in toilet by sport camp

 

हे देखील वाचा :

Palghar News | संतापजनक ! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील धक्कादायक प्रकार

Maharashtra Politics | आम्ही काँग्रेस-शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

Shivsena Vs MNS | शिवसेना-मनसेत जुंपली ! दानवे म्हणाले – ‘मनसे भाजपाची दुसरी शाखा, संदीप देशपांडेंनी दिले प्रत्युत्तर’

 

The post Video Viral News | संतापजनक ! शौचालयातील फरशीवर कबड्डीपटूंसाठी ठेवण्यात आले जेवण, सोशल मीडियावर Video व्हायरल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article